रोग आणि आजारमुक्त व्हायचं असेल तर हा आहार घ्या! || Necessary Food To Stay Healthy प्रश्न: माझा प्रश्न असा आहे की, आम्ही असं समजायचं का....
की हे....शाकाहारी असणं, दारू न पिणं, ब्रम्हचर्य....ह्या सगळं आचरण आणून आपलं शरीर सुदृढ बनावायचं, जेणेकरून ही ११ मिनिटांची क्रिया अधिक परिणामकारक बनेल?
.
हे बघा, मी सुरुवाती पासूनच हे म्हणतोय की, खाण्याकडेसुद्धा एक आपण नैतिकता म्हणून का बघतोय? अन्नाचा संबंध शरीराशी आहे. आपण तेच खायला हवं जे या शरीरासाठी सुसंगत आहे. पण आता तुम्ही अन्नाला एक सवयीमध्ये बदलत आहात. मला तुम्हाला सांगायचंय, की चांगली सवय किंवा वाईट सवय असं काही नसतं. ‘सवय’ म्हणजे अजाणपणे तुम्ही कार्य करताय. तुम्ही जर आजाणपणे कार्य करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही, कारण मनुष्य असण्याचा अर्थच हा आहे की आपण प्रत्येक गोष्ट सजगतेने करू शकतो. मनुष्य असण्याचा हा अगदी सर्वात सुंदर पैलू आहे, की आपण सजगतेने कार्य करू शकतो. इतर प्राणी ज्या गोष्टी अजाणतेपणी करतात त्याचगोष्टी आपण सजगतेने करू शकतो.
आपण अजाणपणे खाऊ शकतो, किंवा आपण सजग राहून खाऊ शकतो. आपण अजाणपणे श्वास घेऊ शकतो किंवा सजगतेने. जे जे काही आपण करू शकतो, ते ते सर्वकाही सजग होऊन करू शकतो.
ज्याक्षणी एखादी व्यक्ती सजगतेने कार्य करू लागते तेव्हा अचानक ती व्यक्ती सुसंकृत, आणि अद्भुत वाटू लागते. एखादी व्यक्ती सजगतेने चालू, बोलू लागली तर ती व्यक्ती विलक्षण, अद्भुत दिसते....हो ना?
Questioner:हो (Audience)
बस येवढच!!
तर मग आपण का सवयी लावून घेण्यासाठी का धडपडत आहोत जणूकाही त्या चांगल्या गोष्टी आहेत? सवय म्हणजे साचेबद्ध स्थिती, जिथे तुम्हाला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही; तुम्ही सकाळी उठा आणि सवयी प्रमाणे गोष्टी घडू लागतात.....
नाही....तुमचं आयुष्य ऑटोम्याटिक बनवण्याचा प्रयत्न करू नका. ती काही कार्यक्षमता नव्हे. ती एखाद्या निर्जीव यंत्राची कार्यक्षमता असू शकते…
पण ह्यानं (pointing to himself) बुद्धिनं आणि सजगतेनंच काम करायला हवं; ह्यानं एखाद्या यंत्रासारखं काम करण्याची कोणाचीहि अपेक्षा नाहीये.
तर, आहारा बद्दल....ज्या शरीरासाठी आपण आहार घेतोय त्यासाठी तो योग्य असला पाहिजे. ते शरीरासाठी आहे. आपण खाल्लेले अन्न...हे शरीर जडण-घडवणीचा मुख्य घटक आहे. पण योग्य आहार ... आजकाल दुर्दैवाने याबतीत सर्वकाही गोंधळ

0 Comments